मुंबईतल्या या भागांमध्ये मिळणार फ्री वायफाय, पाहा संपूर्ण यादी

 मुंबईमध्ये फ्री वायफाय सुविधा द्यायचा निर्णय घेतल्यानंतर आता ज्या भागांमध्ये ही वायफाय सुविधा देण्यात येणार आहे, त्या भागांची घोषणाही सरकारनं केली आहे.

Updated: Jan 9, 2017, 09:49 PM IST
मुंबईतल्या या भागांमध्ये मिळणार फ्री वायफाय, पाहा संपूर्ण यादी  title=

मुंबई : मुंबईकरांना सार्वजनिक वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 'आपले सरकार मुंबई वाय-फाय' या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्विट करून केला.

या टप्‍प्यात पाचशे सार्वजनिक हॉटस्पॉट्स मुंबईकरांना उपलब्ध झाले आहेत. आपले सरकार मुंबई वायफाय या प्रकल्पांतर्गत मुंबई शहरात 1 मे 2017 पर्यंत 1200 हॉटस्पॉट्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या स्वरुपाचा हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असून वापरकर्ते नागरिक आणि ‘वायफाय लोकेशन्स’ची संख्या लक्षात घेता जगातील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी तो एक प्रमुख प्रकल्प असेल.

फ्री वायफाय मिळणारी ठिकाणं पाहण्यासाठी इथे क्लिक करा