मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेने टोला लगावला आहे. गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनीच गुलाम अली आणि कसुरीच्या घटनेवर दु:ख व्यक्त करणे हे दुर्देव असल्याचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी आणि गुलाम अली यांच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं होतं, अशा प्रकारच्या घटना या आधीही झाल्या असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. मात्र मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेनेने घणाघाती प्रहार करत, "गोध्रा आणि अहमदाबादमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख जगभर झाली, आम्ही त्यांना आदर्श मानतो, पण त्यांनी गुलाम अली आणि कसुरींच्या घटनेवर दुख व्यक्त करणे दुर्देव आहे", असं शिवसेनेने म्हटलं आहे.
जगजित सिंह यांच्या स्मरणार्थ मुंबई, पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात गायनासाठी गुलाम अली पाकिस्तानातून येणार होते, पण शिवसेनेने विरोध केल्याने गुलाम अली भारतात आले नाहीत.
दुसरीकडे पाकिस्तानचे माजी मंत्री कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं, याला शिवेसेनेने विरोध केला, तसेच कार्यक्रमाचं आयोजन करणारे सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासलं, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केल्याने, शिवसेनेने तिखट शब्दात नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.