बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे, मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय.

Updated: Sep 8, 2014, 02:02 PM IST
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट title=

मुंबई: मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे, मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय.

भारतीय गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून दुचाकी किंवा चार चाकी वाहनांमध्ये मिरवणुकीदरम्यान विस्फोट घडविण्याचा त्यांचा प्लान आहे. त्यामुळं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय.

मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी तातडीनं पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. मिरणुकीच्या मार्गात पार्किंगवर नजर ठेवण्यात येतेय. सर्व वाहनांची कसून चौकशी केली जातेय. पोलिसांसह विशेष जवानांची तुकडीही सुरक्षा व्यवस्था करतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.