मुंबई : महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं होतेय. आज संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुका राष्ट्रपती राजवटीखाली होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आता भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी ही मागणी केली आहे. राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढलाय. त्यामुळं सरकार अल्पमतात आल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी खडसेंनी केली आहे.
यासंदर्भात खडसे थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. राज्यात घटनात्मक पेज निर्माण झाला आहे. कारण राज्यपाल हे दुसऱ्या पक्षाचे आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर पेच निर्माण झाला असता. मात्र, मंत्रिमंडळातील कोणी एकाने राजीनामा दिला म्हणून राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही. परंतु राज्यपाल मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहा, असा सल्ला देऊ शकतात. मात्र, तसे होईल की नाही, याबाबत शंका आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढल्यामुळं काँग्रेस सरकार अल्पमतात आलंय. राज्यात निवडणुका असल्यानं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी की दुसरे सरकार स्थापन असेपर्यंत अल्पमतातले सरकार कायम ठेवावे याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. मुख्यमंत्र्यांनी याच पार्श्वभूमीवर राज्यपालांशी चर्चा केल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.