'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री

'सॅव्ही' नावाच्या एका मॅगझीनच्या जून २०१६ कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री दिसणार आहेत. 

Updated: Jun 11, 2016, 01:24 PM IST
'सॅव्ही' मॅगझीनच्या कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री title=

मुंबई : 'सॅव्ही' नावाच्या एका मॅगझीनच्या जून २०१६ कव्हर पेजवर मिसेस मुख्यमंत्री दिसणार आहेत. 

या मॅगझीनच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मॅगझिनच्या कव्हर पेजवर जागा मिळालीय. 

amruta-fadnavis-2
'सॅव्ही'चं कव्हर पेज

अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी 'सॅव्ही'चं कव्हर पेज मीडियासमोर प्रदर्शित केलं. यावेळी एक्सिस बँकेच्या संचालिका आणि सीईओ, फिटनेस एक्सपर्ट शिखा शर्मा असे अनेक जण उपस्थित होते. 

आपल्या कव्हर स्टोरीमध्ये (आय बिलिव्ह) अमृता यांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव शेअर केलेले आहेत, आपल्या पतीसोबतच आपल्या नात्याची विण, फिट राहण्याची पॅशन आणि नेहमी आनंदी राहण्याची सवय यांबाबतीत त्यांनी भाष्य केलंय. 

१६ जूनला प्रसिद्ध होणाऱ्या सॅव्ही मासिकाच्या कव्हरपेजवर अमृता फडणवीस आपल्याला पाहायला मिळतील. घर आणि काम या दोन्ही आघाडी सांभाळण्यात यशस्वी ठरल्याबद्दल त्यांना हा मान मिळाल्याचं सांगण्यात येतंय.