पहिल्याच पावसात उपनगरीय रेल्वे सेवेचा बोजवारा

गेल्या काही दिवसांपासून ज्याची मुंबईकर चातकासारखी वाट पाहत होते तो अखेर आलाय. पावसाने मुंबईत आज दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसाने मुंबईकर सुखावले जरी असले तरी ऑफिसात जाणाऱ्या मुंबईकरांची मात्र चांगलीच धावपळ उडालीये.

Updated: Jun 11, 2016, 11:01 AM IST
पहिल्याच पावसात उपनगरीय रेल्वे सेवेचा बोजवारा  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्याची मुंबईकर चातकासारखी वाट पाहत होते तो अखेर आलाय. पावसाने मुंबईत आज दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसाने मुंबईकर सुखावले जरी असले तरी ऑफिसात जाणाऱ्या मुंबईकरांची मात्र चांगलीच धावपळ उडालीये.

पहिल्याच पावसात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा बोजवारा उडालाय. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झालीये. चर्चगेटला स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आलीये. 

मध्य रेल्वेवर सीएसटीकडे जाणारी स्लो ट्रॅकची वाहतूक 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. तर हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडालाय. 

दरम्यान, प्रवाशांसाठी मुंबई मुलुंड आणि वाशीहून विशेष बस सेवा सुरु करण्यात आलीये.