मुंबई : अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलानं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अखेर एफआयआर दाखल केलाय.
रात्री उशीरा आंबोली पोलीस स्टेशनमध्ये अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी लोटस बिझनेस पार्क सोसायटीविरोधात तक्रार दाखल केली.
फायर सेफ्टीच्या नियमांचे केलेले उल्लंघन आणि निष्काळजीपणा या बाबी अधोरेखीत करीत फायर प्रिव्हेन्शन एक्टअंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.
मागील शुक्रवारी २१ मजली लोटस बिझनेस पार्कला भीषण आग लागली होती. फायर सेफ्टीचे कुठलेही नियम या इमारतीमध्ये पाळण्यात आले नव्हते. त्यामुळं आग तर भडकलीच शिवाय अग्निशमन दलातील एका जवानालाही जीव गमावावा लागला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.