मुंबई : शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भर रस्त्यात एका महिलेला शिवीगाळ करत धमकावल्या प्रकरणी खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून बाळा सामंत यांच्या अटकेचीही शक्यता असल्याचं बोललं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ऑफिसमधून परतत असताना आमदार बाळा सावंत यांनी तिला उद्देशून अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार महिला आणि आमदार सावंत यांच्यात म्हाडाच्या जागेवरून वाद सुरु होता. सध्या खेरवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.