मुंबई: जिया खान मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना हायकोर्टानं चपराक लगावलीय. या प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय.
हा तपास योग्य रितीनं होत नसल्याचा आरोप जियाच्या आई रबिया खान यांनी केला होता. याबाबत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. राम गोपाल वर्माच्या नि:शब्द या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेल्या जिया खानचा मागच्या वर्षी संशयास्पद स्वरुपात मृत्यू झाला होता.
25 वर्षीय जिया खान 3 जून 2013 रोजी जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास लावून घेतलेल्या स्थिती आढळून आली होती. जियाची आई राबिया खान यांनी जियाचा प्रेमी सूरज पंचोली आणि अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा याला मृत्यूप्रकरणी दोषी ठरविलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.