मुंबई : नालासोपारा पूर्व नालेश्वर नगर येथून एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यापासून बेपत्ता झाले आहे. बेपत्ता झालेल्या कुटुंबात सहा मोठी माणसे आणी दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे.
मागील नऊ महिन्यापासून कोणताही संपर्क होत नसल्यामुळे हे कुटुंब कुठे असेल, अचानक का बेपत्ता झाले, का त्यांच्या सोबत काही घातपात झाला असेल या भितीने त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.
याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. नऊ महिन्यापासून आखख कुटुंबच बेपत्ता झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत.