मुंबई : विक्रोळी आणि कांजूर स्टेशनच्या दरम्यान स्टंट करताना लोकलमधून पडून दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, गर्दीमुळे लोकलमध्ये चढायला जागा नसते. अशावेळी टारगट तरुण तरुण स्टंट करुन आपला जीव गमवतात,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राजू खान आणि अमित सिद्धू अशी या दोघांची नावे आहे. राजू, अमित आणि लुकमान खान या तिघांनी कांजूरहून सीएसटीच्या दिशेकडे जाणारी गाडी पकडली. अमित आणि राजू हे दरवाजात लटकून पोल चुकवण्याचा स्टंट करु लागले. त्यावेळी विक्रोळीच्या दिशेकडील पोलचा फटका बसल्याने दोघेही खाली पडले.
दरम्यान, लुकमाननं तातडीनं याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिल्याने दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघं गंभीर जखमी असून दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.