मुंबईत विकली जाताहेत आयपीएलची बनावट तिकीट

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी आयपपीएल मॅचची बनावट तिकिट विकून एकूण २६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 1, 2017, 08:25 PM IST
मुंबईत विकली जाताहेत आयपीएलची बनावट तिकीट  title=

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी आयपपीएल मॅचची बनावट तिकिट विकून एकूण २६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आलाय.

आज मुंबईतील वानखेडे स्टेडिएममध्ये मुंबई इंडीयन्स आणि आरसीबी टीम मध्ये आयपीएलची सामना होता. या सामन्याची बनवट तिकीटं विकून २६ तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.  

कोल्हापूर, सुरत, सोलापूर आणि मुंबई अशा विविध भागांतून आलेल्या तरुणांना दोन दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडिएम परिसरांत काही अज्ञात व्यक्तींनी ही तिकिटे विकली होती. पण प्रत्यक्षात हे २६ तरुण जेव्हा आज सामना पाहायला स्टेडीएममध्ये आले तेव्हा त्यांची तिकीटं स्कॅन झाली नाहीत. 

झी चोवीस तासकडे त्या बनावट तिकिटांची दृश्य आहेत. ही तिकीटं हुबेहुब खरी वाटतायत. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्व २६ तरुणांची तक्रार लिहून पुढील तपास सुरु केलाय. 

धक्कादायक म्हणजे मरीनड्राईव्ह पोलीसांचा वानखेडे स्टेडिएम जवळ कडक पहारा असून देखील ही बनावट तिकिटं विकली गेली याचे आश्चर्य व्यक्त केल जातय.