मध्य रेल्वेचा बिघाड, प्रवासी लटकलेत

मध्य रेल्वेच्या मार्गात पुन्हा एकदा अडथळा आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षातही त्राल लहन करावा लागत आहे. कल्याण- ठाकूर्लीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

Updated: Jan 2, 2015, 10:18 AM IST
मध्य रेल्वेचा बिघाड, प्रवासी लटकलेत title=

ठाणे : मध्य रेल्वेच्या मार्गात पुन्हा एकदा अडथळा आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नववर्षातही त्राल लहन करावा लागत आहे. कल्याण- ठाकूर्लीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

कल्याण-डोंबिवली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने बदलापूरहून सीएसटीला जाणारी ट्रेन कल्याण ते ठाकूर्ली स्टेशनदरम्यान बंद पडली. या बिघाडामुळे सीएसटीकडेच्या दिशेने जाणारी स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

याचा परिणाम फास्ट मार्गावरील वाहतुकीवरही झाला आहे. ऐन कार्यालयीन वेळेत हा बिघाड झाल्याने रेल्वे उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थाकांवर गर्दी दिसत आहे.

दिवा येथे काही रेल्वे रोखल्यामुळे अधिकच गोंधळ उडाला आहे. प्रवाशांना माहिती मिळत नसल्याने प्रवासीही संतप्त झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.