मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप

युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 28, 2017, 07:37 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप title=

मुंबई : युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.

भाजपचा मुंबईतील गोरंगावमध्ये संकल्प मेळावा होता, यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा शिवसेनेवर अशा कडक शब्दात टीका केली.

यापूर्वी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांना कौरवांची उपमा दिली, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी शिवसेनेला कौरवांची उपमा देणार नाही, कारण मी आतापर्यंत कौरवांसोबत बसून कारभार केला असं मी म्हणणार नाही.