मुंबई : मुंबई मेट्रो मध्ये आता प्रत्येक डब्यात महिलांसाठी एक भाग आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापनानं घेतला आहे.
15 ऑगस्टपासून याची अमंलबजावणी करण्यात येईल. चार डब्यांच्या मेट्रोमध्ये प्रत्येक डब्यात एका रेषेद्वारे एक भाग हा आरक्षित करण्यात येणार आहे.
मेट्रो सुरु झाल्यापासून महिलांच्या छेडछाडीच्या काही घटना घडल्या होत्या. त्याचबरोबर मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं मेट्रोमधील गर्दीही वाढत होती.
अशा गर्दीत मेट्रोतून प्रवास करणे हे महिलांना काहीसं अवघड झालं होतं. त्यामुळेच महिलांच्या सुरक्षीत प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.