एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा पोलीस सेवेत

चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै २०१५ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं.

Updated: Jan 11, 2016, 09:59 PM IST
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा पोलीस सेवेत title=

मुंबई : चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै २०१५ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं.

चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाला. दया नायक यांना जुलै २०१५ साली निलंबित करण्यात आलं होतं.

दया नायक यांना २००६ साली अंडरवर्ल्डशी संबंधित कथित आरोपांवरून निलंबित करण्यात आलं होतं. दया नायक यांच्या विरोधात आवकपेक्षा जास्त संपत्ती ठेवण्याचे आरोप होते. एसीबीने या आरोपांची चौकशी केली, मात्र याचे पुरावे हाती मिळाले नाहीत.

अखेर २०१२ साली दया नायक यांना पोलिस सेवेत पुन्हा घेण्यात आलं, नंतर २०१४ साली त्यांना नागपूरची पोस्टिंग दिल्याने ते हजर झाले नाहीत, पुन्हा त्यांना निलंबित करण्यात आले. 

दया नायक यांना आज पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आलं आहे, दया नायक यांची पोस्टिंग कुठे होते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.