अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल.

Updated: Jan 11, 2016, 09:55 PM IST
अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश title=

मुंबई : दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयान दिलेत.

ज्या अनुदानित शाळा सीसीटीव्ही बसवणार नाहीत अशा शाळांचं अनुदान रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. या संदर्भात सर्व अनुदानित शाळांतील मुख्याध्यापकांची तातडीची बैठक बोलावून शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अडचणी उपाययोजना याबाबत बैठकीत आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेत.

गेल्या शनिवारी मुंबईत दादरमधल्या एका शाळेत कॅन्टीनमध्ये काम करणा-या 29 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केला होता.