एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ

विधानसभेत विरोधकांची हजेरी नसली तरी ही कमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पूर्ण केली. अर्थसंकल्पाच्या विविध विभागांच्या चर्चेत खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले. 

Updated: Mar 29, 2017, 06:56 PM IST
एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ title=

दीपक भातुसे, मुंबई : विधानसभेत विरोधकांची हजेरी नसली तरी ही कमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पूर्ण केली. अर्थसंकल्पाच्या विविध विभागांच्या चर्चेत खडसे यांनी सरकारलाच धारेवर धरले. 

औद्योगिक क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाली असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे सांगितले होते. यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत राज्यात आतापर्यंत किती गुंतवणूक झाली ? मुंबई पुणे, नाशिक कॉरीडॉर वगळता राज्यात उद्योगांची स्थिती काय? उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी उद्योगाचे युनिट आलं का, एक तरी  कारखना उभा राहिला का याची माहिती सरकारने द्यावी, असा परखड सवाल खडसेंनी सरकारला विचारला.

ऊर्जा विभागाच्या मुद्यावर खडसे यांनी सरकारला जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही असे खडसे यांनी सांगितले. त्याचबरोबर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खडसे यांनी आपला मोर्चा वळवला. बावनकुळे आपण काय फक्त विदर्भाचे ऊर्जा मंत्री आहेत काय ? विदर्भात कृषी पंपांना वीज मिळते, मग इतर भागात वीज का नाही मिळत असा सवालही त्यांनी केला. 

जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून त्या शेतकऱ्यांना वीज  कनेक्शन का नाही, निवडणुकीत जनतेला आश्वासन दिलं होतं चोवीस  तास वीज देऊ. त्या आश्वासनांचे काय झाले असा खाद्य आवाजात त्यांनी बावनकुळे यांना सुनावले. आपला शब्द आपण पळाला पाहिजे असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारने जण ठेवावी शेतकऱ्यांना आवश्यक असेल तेव्हा वीज देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला रात्री ​आठ ​वाजता वीज देता, शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का. तुमच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगा, रात्री काही पेरता येतं का, असंही खडसे अशा प्रश्नांनी खडसे यांनी सरकारला घाम फोडला आहे.

शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीजबिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन सरकारने द्यावं, असंही खडसे म्हणाले .राज्यात सध्या ऊन वाढतंय. त्याबरोबरच काही ठिकाणी पाणी टंचाई सुरु झालेली आहे. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केली आहे त्याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी हि खडसे यांनी केली. 

पोलीस प्रशिक्षण केंद्राचं भविष्य काय, होणार की नाही. जनतेला  विकासातमक सुविधा देण्यासाठी वाट  बघायला लावू नका,अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली. माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी राज्यातल्या औद्योगिक वसाहतीमधील भ्रष्ट्राचारावरही सरकारला खडे बोल सुनावले . गेल्या अनेक वर्षात अनेकांनी महत्वाचे प्लॉट उद्योगासाठी घेतले. मात्र त्यावर उद्योग उभारले गेले नाहीत. त्यांच्यावर सरकारने गेल्या तीन वर्षात काय कारवाई केली. एमआयडीसीमध्ये परस्पर अधिकारी मनमानी यापद्धतीने कारभार करतात त्याला रोखण्याचे काम सरकारने केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. 

सरकारवरच बसरले

- विधानसभेत एकनाथ खडसेंची सरकारवरच कडवी टीका
- निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर
- २४ तास वीज देण्याचं आश्वासन निवडणुकीत दिलं
- पण वीज मुबलक नाही
- आपलं सरकार आलं, पण आपण शब्द पाळला पाहिजे
- खडसेंनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सरकारला करून दिली आठवण
- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का?
- विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता
- जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही
-  शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का
- अधिकाऱ्यांना जाऊन सांगा, रात्री शेतात काही पेरता येतं का
- शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा
- वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन सरकारने द्यावं
- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे
- पोलीस प्रशिक्षण केंद्राचं भविष्य काय, होणार की नाही
- 15 – 15 वर्ष वाट बघायला लावू नका
- राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली?
- मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय?
- उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का ?
- एक कारखना उभा राहिला का याची माहिती द्यावी

सरकारला घरचा आहेर, सरकारला सवाल

- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भाच्या शेतकऱ्याला 24 तास वीज, मग अन्य शेतकऱ्यांना का नाही?
- शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का, रात्रीची पेरणी करता येईल का?
- शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन देणार का?
- राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय?
- उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एखादा कारखना उभा राहिला ​​का ?