6 कोटींचा ई-टेंडर घोटाळा; 9 जण निलंबित

मुंबई महानगर पालिकेच्या ई टेंडर घोटाळा प्रकरणात नऊ अभियंते निलंबीत करण्यात आले आलेत तर तब्बल 23 अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. 

Updated: Sep 23, 2014, 11:16 PM IST
6 कोटींचा ई-टेंडर घोटाळा; 9 जण निलंबित title=

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या ई टेंडर घोटाळा प्रकरणात नऊ अभियंते निलंबीत करण्यात आले आलेत तर तब्बल 23 अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. 

तब्बल 17 हजार निविदांपैकी 412 निविदांमध्ये घोळ असल्याचं उघड झालंय. 6 कोटींचा हा घोटाळा असल्याचं सांगण्यात येतंय. 40 कंत्राटदारांना यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सभागृहात दिलीय.   

काय आहे हा ई-टेंडर घोटाळा?  
वॉर्ड स्तरावर काढण्यात आलेल्या कामांमध्ये हा घोटाळा झालाय. एखाद्या कंत्राटदारालाच कामाचे कंत्राट देण्यासाठी पालिकेचे अभियंते रात्रीच्या वेळेस ई-टेंडर काढत आणि संबंधित कंत्राटदार तो टेंडर भरत असे. त्यानंतर संबंधित ऑनलाईन टेंडरची लिंक ब्लॉक केली जाई. ज्यामुळं इतरांना हे टेंडर भरता येत नसे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.