मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळानं सादर केलेल्या अहवालानुसार डोंबिवली सर्वाधिक गर्दीचं स्थानक ठरलंय. डोंबवलीत रोजची प्रवाशांची संख्या २.५ लाखांवर पोहोचली आहे.
दादर, सीएसटी, ठाणे, कल्याण अशी स्थानक सर्वाधिक गर्दीची म्हणून ओळखली जातात. मात्र, या स्थानकांनाही डोंबिवलीनं मागं टाकलय. तर छोट्या स्थानकांत गृहीत धरलेल्या दिव्यातील रोजची लोकल प्रवासी संख्या एका वर्षात तब्बल १२ लाखांनी वाढली आहे. त्यामुळे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांच्या यादीत दिव्यानंही स्थान मिळवलंय.
गेल्या काही दिवसांपासून कोपर ते दिवा दरम्यान अपघातांच प्रमाण वाढल असून यावर काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.