सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली

सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला. 

Updated: Dec 8, 2015, 09:20 AM IST
सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली title=

मुंबई : सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला. 

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने मोठी हानी टळली. लोकल शटिंगच्या वेळेस ही घटना घडली. या अपघातामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलचे नुकसान झाले. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून वाहतूक काही बंद होती. 

मात्र आता प्लॅटफॉर्मवरून लोकल हटवण्यात आली असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. यापूर्वी चर्चगेट स्थानकात लोकल बफर एंडला धडकल्याची घटना घडली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.