मुंबई पावसाने चिंब, मध्य-हार्बर रेल्वे विस्कळीत

 मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगडमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता मुंबईत पाऊस धाऊन आलाय. तीन तासांत मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद झालीय. दरम्यान, या  पावसाचा फटका रेल्वेला बसलाय. मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Jul 2, 2014, 01:42 PM IST
मुंबई पावसाने चिंब, मध्य-हार्बर रेल्वे विस्कळीत title=

मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण, रायगडमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता मुंबईत पाऊस धाऊन आलाय. तीन तासांत मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद झालीय. दरम्यान, या  पावसाचा फटका रेल्वेला बसलाय. मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेल्या महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस हा तीन तासात मुंबईत झाला. घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये पावसाचं पाणी साचलं. पहिल्याच पावसात दैना उडालीआहे. मुंबईतल्या चुनाभट्टी येथे सिग्नलमध्ये बिघाड झालाय. तर कुर्ला येथे पाणी भरल्याने हार्बरची सेवा ठप्प झालेय. तर मध्य रेल्वेची सेवा उशीराने सुरु आहे. 20 ते 25 मिनिटे गाड्या उशीराने धावत आहेत. मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बोरीवलीत गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दोन-तीन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. त्याआधीच पाऊस मुंबईत धाऊन आलाय. 

ठाणे, कर्जत, रायगडमध्येही पावसाची चांगली सुरुवात झालीय. त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. आता तरी दमदार पाऊस पडू देत अशी अपेक्षा सगळेजणच व्यक्त करतायत. तर लोणावळ्यामध्येही कालपासून पाऊस सुरु झालाय. नेहमीच्या प्रमाणापेक्षा पाऊस पुरेसा नसला तरीही हे ही कमी नाही अशी भावना इथले नागरिक व्यक्त करतायत.

कोकणात रत्नागिरीत पाऊस आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पाऊसाची प्रतिक्षा कायम आहे. दुष्काळाचे सावट असताना पावसाचा धावा शेतकरी करीत आहेत.

कोठे किती पाऊस 
मुंबईत 105 मिमी पावसाची नोंद
कुलाब्यामध्ये 22.8 मिमी पावसाची नोंद
सांताक्रुझमध्ये 11.8 मिमी पावसाची नोंद
महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 29 मिमी पावसाची नोंद

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.