नायर हॉस्पीटलच्या डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू

मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 31, 2013, 02:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.
अवघ्या २५ वर्षांचा सुमेध हा मूळचा चंद्रपूरचा... नायर हॉस्पिटलमध्ये तो एमडी करत होता... प्रकृती बिघडल्यानंतर सुमेधवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत जाऊन डेंग्यूने त्यांचा बळी घेतला आहे.
पालिकेला साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याचंच या घटनेतून सिद्ध होतंय. एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे महापालिका हॉस्पिटलमधील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
दरम्यान, आणखी एका डॉक्टरलाही टायफॉइडची लागण झाली असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.