मुंबई : 'मुंबई कॅन डान्स साला'चं म्युझिक लाँचींग भलतंच गाजलं ते मॉडेल आणि डायरेक्टरच्या हाणामारीमुळे...
डायरेक्टर सचिन्द्र शर्मा याच्यावर कास्टींग काऊचचा आरोप करत मॉडेल मनीषा कुमारीनं या म्युझिक लाँचिंगच्या वेळी स्टेजवर जोरदार हंगामा केला.
मॉडेल मनीषाकुमारी ही राखी सावंत हीची मैत्रीण आहे. काल रात्री उशीरा राखी सावंत हीच्या 'मुंबई कॅन डान्स साला'चं म्युझीक लॉन्चिंग होतं. या कार्यक्रमादरम्यान मनिषाकुमारी आणि डायरेक्टर सचिन्द्र शर्मा यांच्यात वादावादी झाली आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं...
चक्क मीडियासमोरच या अभिनेत्रीनं डायरेक्टरच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे कार्यक्रमात तणावाचं वातावरण झालं होतं.
या प्रकरणी डायरेक्टर सचिन्द्र शर्मा याच्यावर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये छेडछाड आणि हाणामारीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून मॉडेल मनीषा कुमारीवरही गुन्हा नोंदवण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.