मुंबई : पहिल्या टप्प्यात भाजपच्या 50 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर पुढील आठवड्यात भाजपची पहिली यादी प्रसिद्ध होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये गेलेल्या निरीक्षकाचे अहवाल घेण्यात आले आहेत, कोणत्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर कार्यकर्त्यांची काय मते आहेत, ही सर्व माहिती घेण्यात आली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.
यानंतर साधारणपणे थोडीबहुत चर्चा आम्ही केली आहे, काही अहवालांवर चर्चा केली, आणिम मतं नोंदवून घेतली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कॅम्पेन कशा प्रकारे केलं पाहिजे, कोणत्या मुद्यावर जोर दिला पाहिजे, ते सर्व कशाप्रकारे सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, मीडियाचा वापर कसा केला पाहिजे यावर चर्चा झाली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.