मुंबई : राज्याचे वाहतूक मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे, या अपघातात रावते सुदैवाने बचावले आहेत. रावते यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे.
लोअर परेलला आज बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. धडक एवढी जोरदार होती की गाडीचा ड्रायव्हरच्या बाजुचा भाग पार चेपला गेल्याचे चित्रात दिसत आहे.
रावते यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, आणि थो़ड्याच वेळात त्यांना डिसचार्जही देण्यात आला. रावतेंच्या गाडीला धडक देणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला एन. एम. मार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
'रस्त्यावरील सुरक्षा आणि रॅश ड्रायव्हिंगला प्रतिबंध कसा करता येईल', यांसदर्भातली महत्त्वाची बैठक संपवून रावते परत येत होते. त्यावेळी लोअर परेलमध्ये फिनिक्स मिलजवळ एका भरधाव गाडीने रावतेंच्या गाडीला धडक दिली.