मालवणीतील त्या मृत महिलेल्या मृत्यूचे गूढ उकललं, दिराला अटक

जानेवारी महिन्यात मालवणीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात मालवणी पोलिसांना यश आलंय. महिलेची हत्या तिच्या मोठ्या दिरानं त्याच्या मित्राला सोबत घेऊन केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Updated: May 24, 2016, 04:30 PM IST
मालवणीतील त्या मृत महिलेल्या मृत्यूचे गूढ उकललं, दिराला अटक title=

मालवणी : जानेवारी महिन्यात मालवणीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात मालवणी पोलिसांना यश आलंय. महिलेची हत्या तिच्या मोठ्या दिरानं त्याच्या मित्राला सोबत घेऊन केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

याप्रकरणातल्या आरोपींना अटक करून त्यांना सोमवारी न्यायलयात हजर करण्यात आलं. या दोघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कठोडी देण्यात आलीय.  जानेवारी महिन्यात मालवणीजवळच्या धारवली गावात जाणाऱ्या रस्त्यावर एका पोत्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला होता. 

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा  दाखल करून चौकशी सुरू केली. तब्बल पाच महिने कसून तपास केल्यावर नुकतचं या प्रकरणाचं गूढ उकललं.