खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये. 

Updated: Jun 4, 2016, 05:49 PM IST
खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी title=

मुंबई : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये. 

गेल्या तीन दिवसांपासून खडसेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन दमानिया यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु होते. वादाच्या कचाट्यात सापडलेल्या खडसेंना अखेर मंत्रिमंडळातून बाहेर पडावचं लागलं. 

दरम्यान, खडसेंवर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केवळ राजीनाम्यावर समाधानी नाहीत. त्यांनी खडसेंची चौकशी करण्याची मागणी केलीये. 

जोपर्यंत ही चौकशी सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय. दुपारी तीन वाजता खडसेंच्या भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणं उजेडात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.