सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात 4 ठार, तीन जखमी

सांताक्रूझमधील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन 4 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Updated: Jul 16, 2015, 01:16 PM IST
सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात 4 ठार, तीन जखमी title=

मुंबई: सांताक्रूझमधील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन 4 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी 11च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलीय. स्फोटाची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळं आजूबाजूचा परिसर हादरून गेला. 
 

दरम्यान, हा सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळं झाला, याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटानंतर आग लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. अग्नीशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.