अजित मांढरे, मुंबई : सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
मीडिया क्षेत्रातील बिझनेसमन पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि शाम राय यांची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत सीबीआय न्यायालयानं १९ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच या चौकशीची परवानगी दिलीय.
दोन दिवसांपूर्वी याबाबत सीबीआयने किल्ला कोर्टातील विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणातील तीनही आरोपींच्या चौकशीकरता परवानगी मागितली होती. त्यावर गेली दोन दिवस न्यायालयात युक्तीवाद सुरु होता.
इंद्राणी सीबीआय चौकशी करता तयार होती तर इतर दोन आरोपींनी सीबीआय चौकशीला नकार दिला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी या प्रकरणी चौकशी करण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. त्यानंतर इंद्राणी मुखर्जी आणि इतर आरोपींची पहिल्यांदा सीबीआय चौकशी करणार आहे.
त्यामुळे, हे प्रकरण आता केवळ शीना बोरा हत्या प्रकरणाशी संबंधीत नसून मोठी आर्थिक हेराफेरीशी संबंधीत असल्याचं म्हटलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.