मुंबई : टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेजिंग रूममध्ये मेकअपच्या टेबलाजवळ मोबाईल फोन सापडला आणि तो व्हिडीओ मोडमध्ये सुरू असल्याचं समोर आल्याने ही बाब उघडकीस आली आहे.
अभिनेत्रीच्या आरोपानुसार, मला मेकअप टेबलखाली एक फोन सापडला, ज्यात कपडे बदलतानाचे माझे अनेक व्हिडीओ होते. एका बंगल्यात ८ जुलै रोजी टीव्ही शोसाठी चित्रीकरण करत असताना हा प्रकार समोर आल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अब्दुल कय्यूम अन्सारी नावाच्या कॉस्ट्यूम असिस्टंटला अटक केली आहे. दरम्यान, मॅजिस्ट्रेट कोर्टाने आरोपीची जामीनावर सुटका केली आहे. तर या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.