मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक

वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला. 

Updated: Jul 15, 2016, 12:36 PM IST
मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक title=

मुंबई : वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला. 

झाकीर नाईकची इंटरनेटद्वारे पत्रकार परिषद घेण्याविषयीची माहिती नाईकच्या एका मित्रानं दिली. ५० वर्षीय झाकीर नाईक सध्या परदेशात आहे. दक्षिण मुंबईमधल्या माझगावमध्ये एका हॉलमध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. 

'शांतीदूत' असल्याचा दावा

यावेळी, झाकीर नाईकनं आपण 'शांतीदूत' असल्याचं म्हटलं. 'माझ्या भाषणांचा अर्धवट भाग दाखवला जातो... माझं चॅनल काहीही चुकीचं काम करत नाही' असा दावाही झाकीर नाईकनं यावेळी केला.