मुंबई : एकीकडे महायुतीमधला पेच कायम असताना आघाडीचं घोडंही जागावाटपावर अडलंय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं सांगितले आहे.
राष्ट्रवादीची आडमुठी भूमिका योग्य नसून राष्ट्रवादी अडून राहिल्यास स्वबळावर लढण्यास आम्ही तयार असल्याचं ठाकरेंनी सांगितले. दिल्लीतील बैठकीनंतर त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडलीय.
या बैठकीत 174 जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा झाली. त्यानंतर सोनिया गांधींसोबत जागावाटपासाठी बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अहमद पटेल, मोहन प्रकाश हजर होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.