निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!

महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

Updated: Sep 20, 2014, 04:43 PM IST
निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ! title=

मुंबई : महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

युतीच्या नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेनं भाजपपुढं जागांचा नवा फॉर्म्युला ठेवलाय. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना 155 जागा लढवेल, तर भाजपला 124 जागा सोडण्यात येतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 7, तर रिपाइंच्या वाट्याला फक्त 2 जागा सोडण्यात येणार आहेत. 

शिवसेना भाजपसाठी 7 आणि स्वाभिमानीसाठी 7 जागा सोडायला तयार झालीय. त्याबदल्यात भाजपनं आपल्या कोट्यातून रिपाइंला 2 जागा सोडाव्यात, असं सेनेचं म्हणणं आहे. तर महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.

या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करून निर्णय घेणार आहे. त्याशिवाय काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव देखील पुढे आलाय. त्यानुसार तासगावची जागा भाजपला हवीय, तर घाटकोपर पश्चिम मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केलाय.

शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव भाजपानं मान्य केल्यास जागांची अदलाबदल करण्यास उद्धव ठाकरेंची हरकत नसल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलंय.

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.