मुंबई : दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्तारोको आंदोलन केले. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ईस्टन एक्सप्रेसवेवर रस्ता रोकला गेला. यावेळी जाळपोळ करण्यात आली.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या एकाही नेत्याने जवखेडे येथे भेट का दिली नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.
दरम्यान, ठाण्याच्या कोपरी येथे रिपाईंच्या कार्यकर्त्यांनीही रस्तारोको केलं. दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपाईंही रस्त्यावर उतरली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.