खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात. 

Updated: Nov 1, 2014, 12:50 PM IST
खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा title=

मुंबई: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात. 

मात्र राज्यात नवे सरकार नुकतेच स्थापन झाले असून उपमुख्यमंत्री कोण याची घोषणा अद्यापही झालेली नाही. त्यामुळं हा मान मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला आला.  येत्या ३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून विठ्ठल मंदिराच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं. 

मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा मान त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नेते एकनाथ खडसे यांना बहाल केला असून ३ नोव्हेंबरला पहाटे खडसे ही पूजा करतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.