पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरुवातीपासून चुरशीची लढत झाली. यात काँग्रेसने बाजी मारली आहे. 17 जागा मिळत प्रथम क्रमांक पटकावला. तर सत्ताधारी भाजपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सत्ताधारी भाजपला मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांना जोरदार टक्कर दिली असली, तरी मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही. त्यामुळे या पक्षांना सत्तास्थापनेसाठी छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस गोव्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची सर्वाधिक संधी आहे.
काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपच्या जागा 21 वरुन 13 वर आल्या आहेत. महाराष्ट्र गोमांतक आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला आहे. तर तीन अपक्ष विजयी झाले आहेत.