दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मिलींद देवरा आणि नसीम खान या काँग्रेसच्या दोन नेत्यांनी नारायण राणेंची भेट घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा निरोप घेऊन हे दोघंही राणेंना भेटल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यामुळे नाराज नारायण राणेंचं मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राणेंना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नारायण राणे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.