मुंबई : शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले.
तसेच अधिका-यांची उप जिल्हाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असल्याचं देखील न्यायालयात सांगण्यात आलं. नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत काम चुकीच्या पध्दतीने अधिकृत करून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आयुक्तांविरोधी दिवाणी आणि फौजदारी अवमान नोटीस बजावली होती.
हे बांधकाम कोणत्या नियमाखाली नियमित केलं याबाबत आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे खुलासा मागितला होता. त्यानुसार आयुक्तांनी न्यायालयात हजर राहून बिनशर्त माफी मागितली. अनावधानाने हा आदेश निघाल्याचं सांगत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं.