सीएनजीवर चालणारी टू-व्हीलर मुंबईत लाँच

सीएनजीवर चालणा-या पहिली टू-व्हीलर मुंबईत लाँच करण्यात आलीये. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु राज्य मंत्री धर्मेश प्रधान यांच्या हस्ते ही टू-व्हीलर लाँच करण्यात आली. 

Updated: Jan 2, 2017, 09:57 AM IST
सीएनजीवर चालणारी टू-व्हीलर मुंबईत लाँच title=

मुंबई : सीएनजीवर चालणा-या पहिली टू-व्हीलर मुंबईत लाँच करण्यात आलीये. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु राज्य मंत्री धर्मेश प्रधान यांच्या हस्ते ही टू-व्हीलर लाँच करण्यात आली. 

1.2 किलो सीएनजीची क्षमता असलेली ही गाडी 120 ते 130 किमी प्रति किलो धावू शकते. वाढतं प्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीनं ही काळाची गरज असल्याचं प्रधान यांनी यावेळी म्हटलं.

शिवाय मुंबई नागपूर समृद्धी मार्गालगत गॅस पाईपलाईन टाकण्याची योजना असल्यांचं त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ग्रीन एनर्जी वापरणा-या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष गुण देऊ असं यावेळी तावडे म्हणाले.