मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कचा इशारा

आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. 

Updated: Aug 31, 2015, 06:12 PM IST
मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कचा इशारा  title=

मुंबई : आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. 

बैठकीत पुढील मुद्द्यांचा समावेश होता. 

- याकूब मेमनच्या फाशीनंतर मुंबईत साज-या होणाऱ्या गणपती उत्सवात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना

- त्याचबरोबर गणपती मंडळांनी cctv लावावे, आपल्या कार्यकर्त्यांना ओळखपत्रे द्यावी, सुरक्षेची विशेष खबरदारी घ्यावी, मंडळनी सहकार्य करावे असेही आवाहन केले

- गणपती मंडळाच्या पदाधिकारीला आता परवानगीसाठी फिरावे न लागता, महापालिकेत एक window system करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या एका window मधे मंडळाना परवानगी मिळणार

- कुंभ मेळा, त्यात गणपती उत्सव, दहिहंडी यासारखे सण एकत्र येत असल्याने पोलिसांवरही ताण येत आहे

- सर्व महापालिकांना रस्त्यावरचे खड्डे भरण्याचे आदेश दिले आहेत

- सार्वजनिक गणपती मंडळांनी महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती पाहता स्वतःहून मुख्यमंत्री सहायता निधि देणार असल्याचे स्पष्ट केलं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.