'निकालाच्या दिवशी औकात दाखवू'

भाजपच्या मुंबई संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे.

Updated: Jan 28, 2017, 07:58 PM IST
'निकालाच्या दिवशी औकात दाखवू' title=

मुंबई : भाजपच्या मुंबई संकल्प मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे. 60 जागा देऊन आमची औकात काढणाऱ्यांना निकालाच्या दिवशी औकात दाखवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच मुंबईत परिवर्तन अटळ आहे, निकालाच्या दिवशी विरोधकांना पाणी पाजणारच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- आम्ही करमणूक आणि जुगलबंदी करणारे लोक नाही, आम्ही नोटबंदी, भ्रष्टाचार बंदी करणारे लोक आहोत

- विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या 151 जागांच्या हट्टामुळे युती तुटली-मुख्यमंत्री

- युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो, युती तुटल्यामुळे भाजपची ताकद दिसली

- मी शिवसेनेला कौरव म्हणणार नाही कारण सत्तेत मी त्यांच्या मांडीला मंडी लावून बसलोय, मुख्यमंत्र्यांचा आशिष शेलार यांना टोला

- तुमच्या विचारांशी नाही तर आचाराशी फारकत आहे, तुमचे विचार वेगळे आणि आचार वेगळे

- पारदर्शकतेबद्दल बोललो यात माझं काय चुकलं

- शिवाजी महाराज भाषणांपूरते ठेवायचे आणि त्यांच्या नावाने खंडण्या वसूल करायच्या, म्हणून आमची पारदर्श अजेंडाची मागणी होती

- 21 तारखेला आमची अवकात आणि तुमची अवकात दाखवून देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

- 60 जागा दिल्या तेव्हा पारदर्शक अजेंडा तुम्हाला मान्य नाही हे स्पष्ट झालं

- काँग्रेस-राष्ट्रवादीशी विचारांची तर शिवसेनेशी आचारांची लढाई

- 25 वर्ष आमची सडली नाहीत, कोणा बरोबरही फरफटत जाऊ नका हे 25 वर्षात शिकलो

- करून दाखवलं हे आपण म्हणण्यापेक्षा जनतेनं म्हणावं, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

- आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे