'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं'

मुंबईत नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळालीय... ही माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलीय. 

Updated: May 11, 2017, 08:19 PM IST
'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं' title=

मुंबई : मुंबईत नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळालीय... ही माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलीय. 

महापालिकेच्या अखत्यारीत असलेला हा तब्बल १५ हजार कोटींचा प्रकल्प आहे. नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत २९.२ किलोमीटरचा हा कोस्टल रोड असणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मार्गाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली होती. या मार्गातील दुसऱ्या टप्प्याला बुधवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 

या कोस्टल रोडमुळे पश्चिम दृतगती मार्गाचा ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

केंद्रातील यूपीए सरकार आणि राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं केवळ कोस्टल रोडबद्दल वायफळ बडबड करत १५ वर्ष फुकट घालवली... परंतु, केवळ दोन वर्षांत आम्ही हा रोड बांधण्यासाठी सर्व परवानग्या मिळवल्या, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.