आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 26, 2014, 09:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता राज्यातल्या सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोण्याही उत्पन्नाची मर्यादा न ठेवता सर्वांसाठी मोफत औषधं उपलब्ध होणार आहेत. तसंच संरक्षित झोपड्यांच्या १९९५ नंतरच्या हस्तांतरणाला सरकारनं परवानगी दिल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.  तसंच राज्यातल्या १३८ नवीन नगरपालिकांना मंजुरी देण्यात आलीय.

व्हिडिओ पाहा - आणखी काय काय केल्यात घोषणा... ऐका मुख्यमंत्र्यांच्याच तोंडून