'मराठा मरता है या मारता है', या संवादावर पाकिस्तानात टाळ्या

बलुचिस्तानच्या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तंबी दिली. यामुळे बलुचिस्तानमधील मराठ्यांचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. बलुचिस्तानमधील बुगटी म्हणजे महाराष्ट्रातील अठरा पगड जाती.

Updated: Aug 16, 2016, 06:18 PM IST
'मराठा मरता है या मारता है', या संवादावर पाकिस्तानात टाळ्या title=

मुंबई : बलुचिस्तानच्या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तंबी दिली. यामुळे बलुचिस्तानमधील मराठ्यांचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. बलुचिस्तानमधील बुगटी म्हणजे महाराष्ट्रातील अठरा पगड जाती.

पानीपतच्या युद्धाच्या पराभवानंतर काही मराठ्यांना गुलाम करून नेण्यात आलं, त्यावेळी ते स्थलांतरीत झाले. बलुचिस्तानमध्ये अशा मराठ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे.

याबाबतीत असं म्हणतात की नाना पाटेकरचा गाजलेला तिरंगा हा सिनेमा, १९९० च्या दशकात बलुचिस्तानमधील डेरा बुगटी  या ठिकाणी सिनेमागृहात लागला होता.

तिरंगा सिनेमात नाना पाटेकरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.यात नानाचं एक संवाद आहे, 'मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं'. या संवादावेळी प्रेक्षकांनी त्यावेळी चित्रपटगृहातील या जोरदार शिट्टा आणि टाळ्यांनी गोंधळ घातला होता. 

यावरून या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं दिसून येतंय, बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी 'द ग्रेट मराठा' ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.