खुशखबर : चर्चगेट-डहाणू रेल्वेचा शुभारंभ

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून चर्चगेट ते डहाणू अशी लोकलसेवा सुरू होतेय. या मार्गावर २० लोकलसेवा आणि चार शटलसेवा सुरू होत आहेत. या नवीन सेवेमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 16, 2013, 09:46 AM IST

www.24taas.com, मुंबई
पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून चर्चगेट ते डहाणू अशी लोकलसेवा सुरू होतेय. या मार्गावर २० लोकलसेवा आणि चार शटलसेवा सुरू होत आहेत. या नवीन सेवेमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
डहाणू-चर्चगेट लोकलला अखेर मुहूर्त सापडलाय. आज केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणू-चर्चगेट लोकल डहाणू स्टेशनहून प्रस्थान करणार आहे. चर्चगेट-डहाणू लोकल सेवा सुरु व्हावी, अशी मागणी गेल्या १७ वर्षांपासून पालघर आणि डहाणूकर करत आहेत. अखेर आज त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.

लोकल सुरु होणार या बातमीनं पालघर डहाणूकर सुखावलेत आणि भारावलेतही. आज सकाळी १० वाजता पहिल्या डहाणू-चर्चगेट लोकल सेवेला हिरवा कंदिल दाखवला जाईल.