नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक?

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला ब्रेक लागल्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तसे संकेत दिलेत. 

Updated: Apr 19, 2017, 07:50 PM IST
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक? title=

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला ब्रेक लागल्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तसे संकेत दिलेत. 

सध्या कुठलीही निवडणूक नाही, त्यामुळे कुणाचाही पक्षप्रवेश होणार नाही असं पाटील म्हणाले. आम्हाला आमची खोली स्वच्छ ठेवायची असंही सूचक विधान त्यांनी केलयं... मात्र नारायण राणेंची खोली निराळी आहे... तो विषय अमित शाह आणि मुख्यमंत्री हाताळतील, हे सांगायला महसूलमंत्री विसरले नाहीत. 

तर गृहराज्यमंत्री आणि कोकणातले शिवसेनेचे वजनदार नेते दीपक केसरकर यांनीही राणेंना टोला लगावलाय. राणे यांचं प्राबल्य फक्त मीडियातच असल्याचं केसरकर म्हणाले. राणेंनी स्वतःत सुधारणा करावी असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.