मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईत भुजबळांनी पवारांची भेट घेतली, आपल्यावरील कारवाई ही आकसापोटी झाली असल्याची बाजू छगन भुजबळ यांनी शरद पवारांकडे मांडली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे महत्वाचे समजले जाणारे नेते छगन भुजबळ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला, यानंतर त्यांच्या घरांवर छापेही टाकले, मात्र अजूनही शरद पवार याच्यावर काहीही का बोलत नाही?, असा सवाल विचारला जात असतांना, छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे.
यापूर्वीही शरद पवार यांनी भुजबळांवर कारवाई सुरू असल्याने याविषयी काही बोलता येणार नाही, योग्य वेळी आपण बोलू असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.