भुजबळ काका-पुतण्यांना जामीन मंजूर

भ्रष्टाचारांच्या आरोपाप्रकरणी मागील काही महिन्यापासून तुरूंगात असलेलेल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. 

Updated: Jun 22, 2016, 02:27 PM IST
भुजबळ काका-पुतण्यांना जामीन मंजूर title=

मुंबई : भ्रष्टाचारांच्या आरोपाप्रकरणी तीन महिन्यापासून तुरूंगात असलेलेल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यासह समीर भुजबळांनाही जामीन मंजूर झाला आहे. भुजबळ काका-पुतण्यांना विशेष एसीबी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती. या दरम्यान छगन भुजबळ यांची प्रकृती खराब झाल्याची त्यांची तक्रार होती. छगन भुजबळ यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो देखील मोठ्या व्हायरल झाला होता.