मध्य रेल्वे होणार फास्ट, दिव्याला वाहनांसाठी लिफ्ट

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.

Updated: Apr 20, 2016, 11:56 AM IST
 मध्य रेल्वे होणार फास्ट, दिव्याला वाहनांसाठी लिफ्ट title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.

दिवा येथील ब्रिजसाठी मरेचा अनोखा पर्याय

ब्रिज बांधताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ब्रिज बांधताना त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यासाठी जागाच उरलेली नाही. अनधिकृत बांधकामांमुळेच ही जागा राहिली नसल्याने उड्डाणपूल पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. यावर मध्य रेल्वेकडून तोडगा काढण्यात आला आहे. 

२० टनाच्या दोन लिफ्ट 

मध्य रेल्वेने पालिकेसमोर पुलाच्या दोन्ही बाजूंना लिफ्ट बांधण्याचा पर्याय ठेवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन-दोन लिफ्ट बांधण्यात येणार असून, त्यांचे प्रत्येकी वजन २0 टन असेल. पुलावर वाहने ये-जा करतील व त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लिफ्टमधून अवजड वाहनांपासून हलक्या प्रकारची वाहने वर-खाली घेऊन जाता येणे शक्य होईल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.